Powai police raid on illegal diesel storage in Hiranandani saam tv
मुंबई/पुणे

४,५०० लिटर डिझेलचा साठा पाहून पोलीसही चक्रावले; मुंबईत मोठी कारवाई

Powai Police Raid On Illegal Diesel Storage In Hiranandani: पवईतील हिरानंदानी परिसरात अवैध डिझेल साठवणुकीवर पोलिसांचा छापा. ४,५०० लिटर डिझेल, तीन पिकअप वाहने आणि इलेक्ट्रिक पंपासह ४१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

पवई परिसरात अवैधरीत्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४,५०० लिटर डिझेल, ३० लोखंडी ड्रम, तीन पिकअप वाहने आणि एक इलेक्ट्रिक पंप असा एकूण अंदाजे ४१ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एन. भू. क्र. ७/५, मौजे कोपरी, वाहनतळासाठी आरक्षित जागा, हिरानंदानी, पवई येथे अवैधरीत्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पवई पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान अफरोज अब्दुल बारी खान (वय ३०), मोहम्मद मोईन नसीम खान (वय ४३) आणि सैबाज इलियास खान (वय २१) हे तिघे कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत परवानगी नसताना डिझेलचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ४,५०० लिटर डिझेल, डिझेलने भरलेले १५ लोखंडी ड्रम, १५ रिकामे लोखंडी ड्रम, एक महिंद्रा पिकअप टँकर, एक महिंद्रा पिकअप वाहन, एक टाटा इंट्रा पिकअप वाहन आणि एक इलेक्ट्रिक पंप जप्त केला आहे. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ४१ लाख ६२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त करण्यात आलेले डिझेल नेमके कुठून आणण्यात आले होते, त्याचा स्रोत काय आहे आणि हे डिझेल चोरीचे आहे का, याबाबत पोलिसांकडून आरोपींकडे चौकशी सुरू आहे. या अवैध साठ्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८७, ३०३(२), ३(५), तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३, ७, ८ आणि मोटार स्पिरिट (पेट्रोल) व हाय स्पीड डिझेल (नियंत्रण) आदेश २००५ मधील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश पाटील व त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT