परमवीर सिंग यांचं निलंबन होण्याची शक्यता  - Saam Tv
मुंबई/पुणे

परमवीर सिंग यांचं निलंबन होण्याची शक्यता

आठवड्याभरात परमवीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण परमवीर सिंग यांचं निलंबन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने देबाशिष चर्कवर्ती समितीचा अहवाल स्वीकारला आहे. परमवीर सिंग यांच्या निलंबनाबाबत चाचपणी करण्यासाठी समिती बनवली होती. या आठवड्याभरात परमवीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समितीनं त्यांच्या निलंबनाबाबत‌ कारणं सुचवल्याची‌ माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान,मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद झाला. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही.

परामबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात जी बैठक झाली. त्याबैठकीची मुंबई पोलीस चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी वाझे आणि सिंग यांच्या भेट आणि चर्चेवर आक्षेप घेतला होता. त्यावर चांदीवाल आयोगाने ही भेट कोर्टाबाहेर झाली आहे त्यामुळे आपण त्यावर काही करू शकत नाही असे म्हंटले आहे. पण मुंबई पोलिसांनी स्वतःहून पुढकार घेत ही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT