Rashmi Shukla News
Rashmi Shukla News Saam Tv
मुंबई/पुणे

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांची महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता; केंद्रातून जोरदार प्रयत्न

Jagdish Patil

मुंबई: वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या विरोधातील तपास बंद करण्यात आल्यानंतर त्या पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्र सरकारने (Central Govt) प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Phone tapping) सहभाग असल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिणामी त्या महासंचालकपदासाठी पात्र ठरल्या नव्हत्या.

मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकारने शुक्ला यांना क्लिन चिट दिल्यानंतर आता त्यांची वर्णी महासंचालकपदी लागावी यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. जर शुक्ला या केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्या तर त्यांना राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (Director General of Police)

सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुल्का यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. त्यामुळे शुक्ला या पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

SCROLL FOR NEXT