#कौलमहाराष्ट्राचा....उद्धव ठाकरेंच्या पाठीवर थाप! Saam Tv
मुंबई/पुणे

#कौलमहाराष्ट्राचा - उद्धव ठाकरेंच्या पाठीवर थाप!

मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामाबद्दल सकारात्मकता तब्बल ६८.३ टक्के

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने कितीही टीका केली तरी जनतेच्या मनात कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाला लोकांनी पावती दिल्याचे साम-सकाळच्या 'मूड महाराष्ट्राचा' या सर्वेक्षणातून दिसते आहेत

महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली. तेव्हापासून भाजपने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवले. विशेषतः धार्मिक स्थळे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप अधिक आक्रमक होता. मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत, हा देखिल मुद्दा भाजपने उचलून धरला होता. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्याही बातम्या अधून मधून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेचे मत मात्र वेगळे असल्याचे दिसते.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान होतेच; त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामाबद्दल सकारात्मकता तब्बल ६८.३ टक्के आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकट करणारा हा कल आहे. कारण, त्यांच्या कामाबद्दल निराशा असणाऱ्यांचा कौल १३.८ टक्के लोकांचाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT