supriya sule saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule: राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखवते, सुप्रिया सुळेंचा घणाघात

आजकाल फडणवीस कधी काय बोलतील याचा भरोसाच राहिला नाही.

रोहिदास गाडगे

पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी आज मतदान होत असताना ही निवडणूक शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक पार पडावी अशी आपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत राज्यातले ED सरकार सातत्याने दडपशाही करुन भिती दाखवत असल्याने सरकारकडून काय अपेक्षा करणार असा चिमटाही यावेळी सुप्रिया सुळेंनी काढला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना चिमटा काढत म्हटलं की, आजकाल फडणवीस कधी काय बोलतील याचा भरोसाच राहिला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर येत आहेत. अमित शाहांच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी अतिथी देव भवो म्हणत बारामतीत जेवढे लोक येतील त्यांचे आमच्याकडून स्वागतच आहे. बारामती ही पहाण्यासारखीच जागा आहे. त्यामुळे जेवढे जास्त लोक येतील त्यांचे स्वागतच आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT