Bhushan Desai  Saam TV
मुंबई/पुणे

Bhushan Desai : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विश्वासू सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश, CM शिंदे म्हणाले...

Political News : एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई यांचे स्वागत केले.

साम टिव्ही ब्युरो

Bhushan Desai Enters Shivsena : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई यांचे स्वागत केले.

बाळासाहेब ठाकरे हेच माझं दैवत आहे. शिवसेना या दोन शब्दांना सोडून माझ्यासमोर तिसरं काही आलं नाही. आठवतही नाही. या राज्यासाठी साहेबांनी स्वप्न बघितलं होतं, ते आज कोण पुढे घेऊन जात असेल, विकास आणि साहेबांचे विचार ते शिवसेना-भाजप युतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे. (Political News)

आम्ही आधीपासूनच एकत्र काम केलं आहे. त्यांना जवळून बघितलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी लहान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. शिंदेंच्या कामामुळे मी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही देसाई यांनी म्हटलं.

माझा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कामाचा वेग, निर्यण, क्षमता मी जवळून अनुभवली आहे, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे. त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आवडल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी हा निर्णय खूप आधी घेतला होता. हे नवं सरकार स्थापन झालं तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता, असंही भूषण देसाई यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol News: इथेनॉल मिक्स करूनही E20 हे E10 आणि शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त का नाही? सरकारने दिलं स्पष्टीकरण

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

SCROLL FOR NEXT