अभिजीत देशमुख
Kalyan News : शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचं राजकीय वैर लपून राहिलेलं नाही. दोन्ही गटाचे नेते एकमेकांना टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र कल्याणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत.
राजकारणासाठी गट तट झाले मात्र गटातटाला कल्याण पश्चिममध्ये थारा नाही. आता एक आहोत आणि पुढे एकत्र राहणार, राजकारण सामाजिक वारसा ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालवावा मात्र विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांणी ठाकरे गटाला केलं.
एकीकडे राज्यात शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट आता संघर्ष पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे कल्याणमध्ये मात्र पारनाका सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्याने देखील सहभाग घेतला होता. (Latest Marathi News)
कल्याण पश्चिमेकडील पारनाका परिसराचे सुशोभीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. कल्याणची ओळख असलेल्या पारनाका परिसराच्या सुशोभीकरनासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते. (Political News)
संघटना पदाधिकारी व ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि एकत्र मिळून या कार्यक्रमाचे भूमिपूजन केल्याचा पाहायला मिळालं. यावेळी आमदार भोईर यांनी पारनाका ही कल्याणची ओळख आहे या परिसराचे सुशिभीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.