Ajit PAwar- Narayan Rane Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO: नारायण राणेंच्या धमकीला अजित पवारांनी एका वाक्यात गुंडाळलं; म्हणाले...

बारामतीत येऊन बारा वाजवेन अशी धमकीच राणेंनी अजित पवारांना दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या धमकीला विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. अजित पवार यांनी केलेल्या एका टीकेवर उत्तर देताना राणे संतापले होते आणि बारामतीत येऊन बारा वाजवेन अशी धमकीच अजित पवारांना दिली आहे.

नारायण राणेंच्या धमकीला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं की, 'त्यांचं स्वागत आहे.'अजित पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर यापेक्षा त्यांचे हावभाव पाहून आता राणे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांच्या पराभवाची आठवण करुन दिली होती. ‘राणेंना एका बाईनं पाडलं’ अशी खिल्ली अजित पवारांनी उडवली होती.

त्यानंतर नारायण राणे यांनी अजित पवार यांना आव्हान देत माझ्या फंद्यात पडू नका. नाही तर मी पुण्यात, बारामतीत येऊन तुमचे बारा वाजवीन, असा इशारा दिला होता.

राणेंच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करत आव्हान राष्ट्रवादी पक्ष स्वीकारत आहे असं म्हटलं. तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील, असंही काकडे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT