Mumbai civic body budget sparks controversy as opposition alleges unequal distribution of development funds. Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई महापालिकेत निधीवरून वाद चिघळणार; सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींचा निधी, विरोधकांची ‘लाखांत’ बोळवण

BMC News : मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ अर्थसंकल्पातील ८०० कोटींच्या विकास निधी वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी तर विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित निधी मिळाल्याचा आरोप होत आहे.

Alisha Khedekar

  • BMC च्या ८०० कोटी निधी वाटपावरून वाद

  • सत्ताधाऱ्यांना कोटींचा, विरोधकांना लाखांचा निधी

  • विरोधकांनी पक्षपातीपणाचा आरोप केला

  • राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

गणेश कवडे, मुंबई

सर्वात श्रीमंत मानली जाणारी मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीसाठी ८०० कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आता ८०० कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत समोर आली, असून सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्याने राजकीय वाद चिघळला आहे.

पालिकेच्या नियमानुसार, दरवर्षी अर्थसंकल्पाच्या मंजुरीपूर्वी स्थायी समितीला विकास निधी दिला जातो. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी हा निधी ५००-६०० कोटींवरून थेट ८०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात येणार आहे. मात्र आता या ८०० कोटींच्या निधी वाटपात असमानता असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

सत्ताधारी नगरसेवकांना सव्वादोन कोटींच्या आसपास निधी असून विरोधकांना केवळ २० ते २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सर्वपक्षीय गटनेत्यांना २ ते २० कोटींपर्यंत निधी देण्यात आला आहे. महापौरांच्या निधी वाटपातून विरोधकांना कमी निधी मिळाल्याने आता राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे. तसेच “या निधीत विकास कामे कशी करायची?” असा सवाल विरोधकांनी केला आहे.

महायुतीतील नगरसेवकांना ८ ते १० कोटींपर्यंत निधी

  • गणेश खणकर – २० कोटी

  • अमेय घोले – १० कोटी

  • संजय घाडी – १० कोटी

  • प्रभाकर शिंदे – २.५० कोटी

  • रितू तावडे – २.२५ कोटी

इतर पक्षांना (गटनेत्यांना) मिळालेला निधी

  • आश्रफ आजमी – २ कोटी

  • किशोरी पेडणेकर – २ कोटी

  • यशवंत किल्लेदार – २ कोटी

  • विजय उबाळे – २ कोटी

  • डॉ. सईदा खान – ३ कोटी

  • अजित रावराणे – २.२५ कोटी

विरोधकांची ‘लाखांत’ बोळवण

  • विशाखा राऊत – २५ लाख

  • आशा काळे – २५ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Maharashtra News Live Update: वर्ध्यातील बापूराव देशमूख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT