sharad pawar
sharad pawar  saam tv
मुंबई/पुणे

Death Threat to Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे.

'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे.  शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.

आयुक्तांनी मला शब्द दिला आहे, ते यात लक्ष घालतील. या सर्वांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. ज्या पद्धतीने गृह विभाग अपयशी होत आहे याकडे अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी माझी विनंती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Supriya Sule

शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचा तातडीने पाठपुरावा करणे गरजेचं आहे. राज्याच्या आणि देशाच्या गुहमंत्रालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. जर काही बरं-वाईट झालं तर याला फक्त गृह विभाग जबाबदार असेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  (Political News)

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं की, राज्यात गुंडाराज सुरु आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालं आहे. सध्या राज्यात द्वेशाचं राजकारण सुरु आहे. पवार साहेबांच्या धमकीच्या मागे कुणाचा अदृष्य हात आहे, याचा शोध लागला पाहिजे. मी राज्यच्या गृह विभागाकडे दाद मागणार आहे. शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही न्याय मागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Rain News | कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडं कोसळली

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुंब्रातील अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

Rinku Rajguru: रिंकूच्या निरागस अदा; लूकपेक्षा चाहत्याच्या खास कमेंटचीच चर्चा

Yami Gautam Welcome Baby Boy : यामी गौतमने दिला गोंडस मुलाला जन्म, फोटो शेअर करत सांगितलं नाव

Pune अपघात प्रकरणी Ravindra Dhangekar यांचं पुण्यात आंदोलन, केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT