A damaged hoarding lies on the roadside after reportedly collapsing onto a moving motorcycle in Thane, sparking safety concerns among residents. 
मुंबई/पुणे

Thane Hoarding Mishap: नेत्यांचे होर्डिंग्ज नागरिकांच्या जीवावर उठले; धावत्या बाईकवर होर्डिंग पडलं

Thane Hoarding Mishap: हल्ली गल्लोगल्ली लोकनेते जन्माला आले आहेत. मग त्यांच्या मुर्खपणामुळे लोकं मेली तरी त्यांना काही देणंघेणं नाही. ठाण्यामध्ये अशाच एका गल्लीतल्या नेत्याच्या खोडसाळपणामुळे जनतेचा जीव कसा धोक्यात आला पाहूयात हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

  • धावत्या दुचाकीवर होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.

  • या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

  • बेकायदा किंवा असुरक्षित होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी

पाहिलंत, ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जिथे रोज हजारो गाड्या धावतात त्याच हायवेवर तीन हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावलेलं होर्डिंग अचानक खाली पडलं आणि एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर आपटलं. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून हे बाईकस्वार वाचले. ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. पण या दुचाकीस्वारावर असा प्रसंग आला तो. शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगमुळे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि श्रीकांत शिंदेंचे फोटो लावून हा बॅनर या सुनील चौधरीच्या कार्यकर्त्यांनी लावला होता. केवळ आणि केवळ शिंदेंसमोर चमकोगिरी करण्यासाठी त्यांच्या सेनेचं लक्ष वेधून घेण्यासाठी लावलेलं हे होर्डिंग ठाणेकरांच्याच जिवावर बेतलं असतं.

२ वर्षांपुर्वी वादळी वाऱ्यात मुंबईतल्या घाटकोपर हायवेवर होर्डींग कोसळलं आणि १८ लोकं मारली गेली होती तर 80 लोकं गंभीर जखमी होती. इतकी मोठी घटना घडूनही निष्पाप लोकांच्या जीवाचं या स्वयंघोषित नेत्यांना कसं काही वाटत नाही? हे बॅनर पडल्यानंतर या चमको नेत्यानं सोशल मिडीयावर दिलगिरीचा व्हिडीओ टाकला.

ऐकलंत हा काय म्हणतोय. यापुढे बॅनर लावताना सुरक्षेची आणि योग्य ती काळजी घेतली जाईल. अरे पण ठाण्याला विद्रुप करायचा ठेका या फुटकळ नेत्यांना कोणी दिला. त्यामुळे ठाणेकरांनी या बॅनबाजीविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ही दुर्घटना झाल्यानंतर जागे झालेल्या महापालिकेनं कारवाईचा सूर आवळलाय. अनधिकृत बॅनरबाजी विरोधात महाराष्ट्र शहर विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा आहे. तसंच होर्डिंगबाबत उच्च न्यायालयानं कठोर निर्देश दिलेत.

जनतेला अडथळा मुक्त रस्ते मिळायला पाहिजे

बॅनरवर क्यूआर कोड बंधनकारक

उड्डाणपूल, मुख्य चौकांमध्ये बॅनरवर पूर्ण बंदी

नोडल कमिटीचं बॅनरबाजांवर लक्ष

रात्री बॅनर लावण्यासाठी पोलिस गस्तीची सूचना

दोषींवर 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दंडाची तरतूद करण्यात आलीय.

मात्र कोर्टाच्या या आदेशनाला कार्यकर्ते मंडळी थेट केराची टोपली दाखवता. आणि नेतेही आपल्या कार्यकर्त्यांच्या या जीवघेण्या कृत्यांकडे कानाडोळा करतात. आणि ठाण्यातही नेमकं हेच घडलंय. त्यामुळे काही गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत.

चमको नेत्याचं बॅनर अनधिकृत होतं तर ते इतके दिवस कसं राहिलं?

महापालिका आणि नोडल कमिटीचं या बॅनरवर लक्ष नव्हतं का?

लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या चमको नेत्यावर कारवाई होणार का?

ठाणेच काय सर्वच शहरांमध्ये स्वयंघोषित कार्यसम्राट, लोकनेते, जननायक, किंगमेकर, आणि जनतेच्या कैवाऱ्यांची कमी नाही. ठाण्यात शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर प्रत्येक गल्लीत किमान डझनभर तरी नेते तयार झाले आहेत. मग वाढदिवस, जयंत्या पुण्यतिथ्या आणि त्याचे धडाधड बॅनर.. शहरं विद्रुप होतायेत, लोकांचे जीव जातायेत. पण याचं कोणालाच सोयरंसुतक नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेविरोधात इराणचा जिहाद; आखाती देशांविरोधात 'कोड 009' मिशन

Maharashtra News Live Update: नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष मेघा पाटकर यांचा संताप

तुम्ही पिताय नकली व्हिस्की? बनावट व्हिस्कीचा ट्रक जप्त, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

High Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

Tuesday Horoscope : आर्थिक लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना मिळणार नव्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT