Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

वडापावची हाव ST कर्मचाऱ्यांच्या अंगलट; जोरदार चर्चा

वडापावची हाव एसटी कर्मचाऱ्यांना अंगलट आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. पण त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला गोंधळ पोलिसांनी (Police) शांत करण्याचा निर्णय घेतला.

हे देखील पहा -

कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कर्मचाऱ्यांना 'वडापाव मिळेल, सगळ्यांनी 18 नंबर फलाटावर चला' असं सांगितलं आणि त्यानंतर वडापाव खाण्यासाठी 18 क्रमांक फलाटावर आलेले एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. त्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडापावची हाव एसटी कर्मचाऱ्यांना अंगलट आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

100 वडापावची ऑर्डर दिली आहे. तिकडे बसून मस्त खा, तिथे तुम्हाला व्यवस्थित बसता येईल असं पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि गनिमी काव्याने ताब्यात घेतलं. कारण 18 नंबर फलाट मोकळं आणि व्यवस्थजत आहे . तिथे गाड्यांना पार्किंग साठी मोकळी जागा आहे. तिथून कोणी पळून जाऊ शकत नव्हते, आणि ताब्यात घेणं सोपा होतं त्यामुळे पोलिसांनी अशी शक्कल लढवली आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT