Pune Police: पुण्यात गोळीबार! घरफोडी करायला आलेल्या चोरट्यांवर पुण्यात पोलिसांचा गोळीबार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: पुण्यात गोळीबार! घरफोडी करायला आलेल्या चोरट्यांवर पुण्यात पोलिसांचा गोळीबार

घरफोडी करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: घरफोडी करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला (Police) केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वसंरक्षणात हवेत गोळीबार केला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. शहरात सातारा रोड परिसरातील चाफळकर कॉलनीत एका निवासी सोसायटीत ही धक्कादायक घटना (Pune) घडली आहे. (Police firing on burglars in Pune)

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, बुधवारी पहाटे पुण्यात एका अनधिकृत अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर कोयता आणि दगडफेक केल्यावर त्यांनी हवेत गोळीबार केला आहे. घटनास्थळावरून पळून गेलेले चोरटे आणि पोलीस यापैकी कोणीही जखमी झाले नाही. हा थरार पहाटे ४ वाजेच्या सुमारास सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला काही चोरटे एका अपार्टमेंटमध्ये घुसताना दिसले होते. आणि त्यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली होती.

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित घरफोडीचा फोन आल्यावर परिसरात गस्त घालणारे २ बीट मार्शल ४ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. रात्रीच्या फेरीत आणखी एक अधिकारी देखील तिथे पोहोचला. अपार्टमेंट जवळ येताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या दिशेने कोयता आणि दगडफेक केली. ३ ते ४ चोरटे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घरफोडी करणारे या सोसायटीच्या मागे असलेल्या झाडाच्या परिसरात पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पहाटेच्या सुमारास ४ ते ५ चोरटे याठिकाणी असलेल्या ५ मजली इमारतीमध्ये शिरले होते. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आवाज झाल्याने शेजारचे नागरिक जागे झाले होते. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण चोरट्यांनी शेजारील फ्लॅटला बाहेरून कड्या लावले होते. यामुळे नागरिकांनी नियंत्रण कक्षाला घरफोडीची माहिती दिली, अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

Skin Care: महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

SCROLL FOR NEXT