on duty police constable dies while chasing criminal suspect saam tv
मुंबई/पुणे

कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत: , आरोपीचा पाठलाग करताना पिंपरीच्या ३८ वर्षीय हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहराला ड्रग्सच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकातील ३८ वर्षीय कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांचा आरोपीचा पाठलाग करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Saam TV News

संत तुकारामनगर परिसरातील आंत्रिक सोसायटीजवळ एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी काही संशयित तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती हवालदार जावेद बागसिराज यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला पथकाने जागेवरच पकडले. मात्र त्याचा दुसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन अंधाराचा फायदा घेत पळून जाऊ लागला.

अचानक कोसळले जमिनीवर

पळून जाणाऱ्या संशयिताचा जावेद बागसिराज यांनी धाडसाने पाठलाग सुरू केला. मात्र, वेगाने धावत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळा आल्या आणि ते रस्त्यातच धाडकन जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृतीरुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना दुसरा तीव्र हृदयविकाराचा झटका आला.

जावेद बागसिराज मूळचे कर्नाटकातील असले, तरी त्यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचा जन्म पुण्यातच झाला होता. २०१० मध्ये ते पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते.

सुरुवातीला हडपसर आणि मुंढवा पोलीस ठाण्यात सेवा बजावल्यानंतर, २०१८ मध्ये स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन झाल्यावर ते येथे रुजू झाले. पिंपरी पोलीस ठाण्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकात ते अत्यंत तत्परतेने आणि प्रामाणिकपणे कार्यरत होते. सोमवारी दुपारी पुण्यातील कसबा पेठ येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

Maharashtra News Live Update: महिला पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप; मद्यधुंद अवस्थेत विरुद्ध दिशेने पळवली कार

Green Paithani Saree For Women: महिलांसाठी हिरव्या रंगाच्या पैठणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन, 5 डिझाईन्स

शेतकऱ्यांना पुण्यात न्याय मिळेना; थेट मंत्रालयात धडक! सर्व कागदपत्रे तपासून पोलीस संरक्षणात कंपाऊंड पूर्ववत करण्याचे निर्देश

मुंबईतील ATS च्या कारवाईनंतर सरकार अलर्ट; रॅपिडो, ओला, उबरबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT