Pune Police: येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने केला आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच झाडून घेतली गोळी गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

Pune Police: येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने केला आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच झाडून घेतली गोळी

येरवडा कारागृहात पोलीस शिपायाने आज पहाटे स्वत: वरच गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे: येरवडा कारागृहात पोलीस (Police) शिपायाने आज पहाटे स्वत: वरच गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अमोल माने असे या पोलीस (Police) शिपायाचे नाव आहे. अमोल माने यांच्यावर ससून रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरुन त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. (Police constable attempts self slaughter at Yerawada jail)

हे देखील पहा-

याप्रकरणाविषयी पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हे येरवडा कारागृहात (Yerawada jail) पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काल गार्ड ड्युटी होती. पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकड असलेली सरकारी रायफल (Rifle) मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. हा प्रकार समजताच त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

या घटनेची माहिती समजल्यावर कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी तसेच ससून रुग्णालयात जाऊन माहिती घेतली आहे. अमोल माने यांनी स्वत: कडील SLR रायफलमधून डाव्या डोळ्याच्या वर कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून घेतली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. अमोल माने हे मुळचे अहमदनगर मधील राहणारे आहेत. ते २०१५ मध्ये कारागृह पोलीस म्हणून भरती झाले आहेत. सध्या ते येरवडा कारागृह वसाहतीत राहत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT