Palghar Crime News, Boisar Police saam tv
मुंबई/पुणे

Palghar Crime News : घरगुती भांडणावरुन नव-याने बायकाेला संपवलं, गुजरातला पळून जाण्याच्या तयारीतील नव-यास अटक

याप्रकरणी चंदा वाघरी यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली हाेती.

रुपेश पाटील

Palghar News : पालघर बोईसर येथील बेटेगाव परिसरातील लोखंडी पाडा परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. संशयित खूना हा गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी बोईसर रेल्वे स्टेशन परिसरात अटक केली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार मिलन दीपक पवार (वय 32) आणि त्याची पत्नी मोहिनी (वय 30) या दाेघांत सातत्याने वाद हाेत असत. त्यातून भांडण हाेत असे. मिलन हा पत्नीला बेदम मारहाण करायचा.

23 जुलैला घरगुती कारणावरून या दोघांमध्ये माेठा वाद झाला. मिलन पवार याने माेहिनीला वायरने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर तिच्या पोटात चाकूने वार करून तिची हत्या केली. तेथून ताे फरार झाला.

याप्रकरणी मृत महिलेची (women) सावत्र बहिण चंदा वाघरी यांनी बोईसर पोलीस ठाण्यात मिलन याच्याविराेधात तक्रार दिली. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिलन पवार याच्या पाेलिसांनी (कलम 302 अन्वये) खूनाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान मिलन हा गुजरात येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला सापळा रचून बोईसर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली अशी माहिती बाळासाहेब पाटील (पालघर पोलीस अधीक्षक) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT