Beed Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: मद्यधुंद कारचालकाने पादचाऱ्यांना उडवलं, पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime News: पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News:

पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. भरधाव कार चालकाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच या प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नारायण पेठमध्ये झालेल्या अपघातावेळी कार चालक आणि साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघडकीस झाले आहे. मद्यधुंद कार चालकाने पाच ते सहा वाहनांना आणि पादचाऱ्याला धडक दिली होती.

पुण्यातील ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता झेड ब्रीज जवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणी वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय ४४ ) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजता केळकर रस्त्यावरून एक भरधाव कार टिळक चौकाकडे चालली होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकापासून काही अंतरावर भरधाव कार आली. त्यानंतर या भरधाव कारने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्याजवळ पाच ते सहा वाहनांना धडक दिली.

भरधाव कारची पादचारी विश्वनाथ राजोपाध्ये यांना जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कार, दोन रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT