अक्षय चौगुले सुरज सावंत
मुंबई/पुणे

धक्कादायक! मुंबईत पोलीस खात्यातील टवाळखोराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी पोलीस खात्यातील एका टवाळखोराला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : आतापर्यंत महिलांची छेड काढणाऱ्या टवाळ खोरांना पोलिसांना अटक करताना सर्वांनी पाहिलं आहे. मात्र मुंबईच्या (Mumbai) भोईवाडा पोलिसांनी पोलीस खात्यातील एक टवाळ खोराला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. (Crime news Marathi)

अक्षय चौगुले (वय ३१) असे या आरोपीचे नाव असून तो पोलिस खात्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहे. विनयभंगच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हा त्याच्यावर दाखल झालेला हा चौथा गुन्हा (Crime) आहे.

अक्षयवर या पूर्वीही भोईवाडा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि चोरीच्या गुन्ह्या़ची नोंद आहे. तर रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातही त्याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल आहे. पोलिस खात्यातून या पूर्वी २०१८ मध्ये त्याला त्याच्या या कृत्यामुळे निलंबितही करण्यात आले होते. (Mumbai Crime News)

हे देखील पहा-

बुधवारी (ता. ५) रात्री बाथरूममध्ये एक महिला अंगोळ करत असताना, अक्षय बाथरूमच्या मागील बाजूस असलेल्या खिडीतून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. त्यावेळी अक्षयला पकडण्यात आले. अक्षयवर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी (Police) त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT