Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईच्या अंधेरीत वैश्या व्यवसायचा पर्दाफाश, २ विदेशी महिला ताब्यात; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंधेरी मरोळ परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंधेरी मरोळ परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश करत दोन विदेशी मुलीना भारतात वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोन दलांलांविरुद्ध कारवाई केली आहे. या दलालांकडून 3 लाख वीस हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ आणि ३८,५००/- किंमतीचा मोबाईल फोन, रोख रक्कम ९,२२०/- रूपये करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील अंधेरी कुर्ला रोड परिसरातील विट्स हॉटेल'मधील रूम नं. ४१८ मध्ये दोन कर्मचारी दलालाच्या मदतीने विदेशी महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेस मिळाली. या दोन्ही विदेशी तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून मिळणारे पैसे देखील दलाल स्वतःकडेच ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ही कारवाई पो. नि. अरुण थोरात (खंडणी विरोधी पथक ) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. बोगस ग्राहक पाठवून समाजसेवा शाखेने हॉटेलवर छापा मारून दोन दलाल आणि दोन विदेशी मुलींना ताब्यात घेतले. यातील दोन दलालांच्या ताब्यातून प्रत्येकी ४ ग्रॅम अंमली पदार्थ व तिसऱ्या आरोपीकडून ८ ग्रॅम अंमली पदार्थ असे एकूण १६ ग्रॅम पदार्थ जप्त केले.

या सर्व आरोपींना न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने ४ अटक आरोपींना ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली. आरोपी दलालांनी विदेशी तरुणींचे पासपोर्ट स्वतःकडे ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने दोन लाख रुपये मागणी केली होती.

त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून हे पैसे वसूल करण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून या दलालामार्फत सुरू होते. शिवाय यातील एक तरुणी उझबेकिस्तान ची असताना तिला भारतीय आधारकार्ड देखील बनवून दिले असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT