Navi Mumbai News, Thane, Dance Bar, Shambhuraj Desai saam tv
मुंबई/पुणे

Dance Bar Video Viral : मंत्री शंभूराज देसाईंचे काेणी ऐकेना, डान्स बारचा व्हिडिओ व्हायरल

मंत्री देसाईंची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे स्पष्ट हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबईत (Navi Mumbai) डान्स बारचा धिंगाणा थांबता थांबेना असे चित्रं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी साम टीव्हीने आर्केस्ट्राच्या नावाखाली सुरु असलेल्या डान्स बारची पोलखोल केली हाेती. त्यावेळी उत्पादनशुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अवैधरित्या चालणाऱ्या डान्स बारवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. (Maharashtra News)

देसाई यांच्या सारख्या कसलेल्या मंत्र्यांच्या आश्वासनाला पोलिसांनी (police) केराची टोपली दाखवल्याचे चित्र आजही दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी पहाटे पर्यंत डान्स बार सुरु असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नेरुळ मधील शिरवणे गावातील बार तर पहाटे पर्यंत सुरु असतात. जेथे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तब्बल दहा ते बारा डान्स बार सुरु असल्याचे दिसून येते.

येथे महिला अश्लील नृत्य करत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहकांसोबत नाचताना (dance) एका व्हिडिओत जाे सध्या व्हायरल (Dance Bar Video Viral) हाेत आहे. त्यात स्पष्ट दिसत आहे. नवी मुंबई पोलीसांचा कोणताही धाक नसल्याने पहाटे पर्यंत हे अनधिकृत डान्स बार सुरुच राहणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. यामुळे तरुणवर्ग देशोधडीला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकारमुळे प्रशासनावरील मंत्री देसाईंची मजबूत पकड ढिली झाली की काय अशी चर्चा आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पुन्हा एका अवैधरित्या चालणाऱ्या डान्सबारवर कारवाई करण्याचे आदेश पाेलिसांना द्यावे लागतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT