tembhode
tembhode saam tv
मुंबई/पुणे

Tembhode News : क्रिकेटच्या मैदानातील हॅण्डग्रेनेडमुळे टेंभोडेत चिंता; अफवांवर विश्वास ठेवू नका ! पाेलीसांचे आवाहन

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे (Tembhode Panvel) गावाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानातील झाडीझुडपात 2 हॅन्ड ग्रॅनाईड सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती समजताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्लास्टिक कोटेड असलेले ते दाेन्ही बनावट हॅन्ड ग्रॅनाईड असल्याचे समोर आले. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे.  (Maharashtra News)

पनवेल (panvel) जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खांदेश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिसराची तपासणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी नवी मुंबई बॉम्ब शोध व निकामी पथकाला पाचारण केले. पथकाने बॉम्ब निकामी करणारा पेहराव परिधान करून यंत्र व श्वानपथकाच्या सहाय्याने हॅण्डग्रेनेड सदृश वस्तूची तपासणी केली.

या तपासणीत पथकाला सदर हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तूत कोणतेही स्फोटक पदार्थ आढळून आले नाही. तसेच ती रिकामी असल्याचे आढळून आले. सदर वस्तू या पथकाने ताब्यात घेतले असून ते कोणी व कशासाठी आणले याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान साम टीव्हीशी बाेलताना पोलीस उपायुक्त पंकज डहाणे म्हणाले नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्या वस्तू स्फाेटक नव्हत्या हे तपासात निष्पन्न झाले आहे. हे 2 डमी हॅन्ड ग्रॅनाईड येथे कोणी आणून ठेवले याचा अधिक तपास खान्देश्वर पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT