Pune, Amit Shah, Pimpri Chinchwad Traffic Diverted saam tv
मुंबई/पुणे

Amit Shah Pune Visit : अमित शहांचा उद्या पुणे दाैरा, जाणून घ्या वाहतुकीतील बदल

नागरिकांनी वाहतुकीतील बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी केले आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri- Chinchwad News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर (amit shah pune visit) येणार आहेत. या दरम्यान अमित शहा यांचा उद्या (रविवार) पिंपरी चिंचवड दौरा देखील असणार आहे. परिणामी चिंचवडमधील वाहतुकीत पोलिस प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

रविवारी अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे चिंचवड येथील वाहतुकीत बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले नागरिकांनी वाहतुकीच्या बदलाची नाेंद घ्यावी तसेच पाेलिस दलास सहकार्य करावे.

जाणून घ्या वाहतुकीतल बदल

महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.

दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.

पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.

हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे असेही (traffic) पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT