sanjay rathod news  saam tv
मुंबई/पुणे

चित्रा वाघ तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, नाहीतर...; पोहरादेवी महंतांचा इशारा

पोहरादेवीच्या महंतांनी संजय राठोड यांना राखी बांधा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महंतांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pohradevi Priest News : आमदार संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्या (Chitra Wagh) चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला कडाडून विरोध दर्शवला आहे. संजय राठोड यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंत्रिपदाला विरोध केल्याने राठोड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिल्यानंतर आता पोहरादेवीचे महंत यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोहरादेवीच्या महंतांनी संजय राठोड यांना राखी बांधा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महंतांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पंरतु, संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्याचबरोबर चित्रा वाघ यांनी देखील संजय राठोड यांच्यावर टीका केली. राठोड यांच्यावर टीका केल्याने पोहरादेवीचे महंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पोहरादेवीचे महंतांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिला आहे. महंत म्हणाले,'तुम्ही खरंच अभ्यासू असाल तर, बोलता तर कोणालाही येऊ शकते. केवळ प्रसिद्धीच्या मोहात जाऊन काही बडबड करू नका. तुम्ही बुद्धीवान असाल तर, संजय राठोड यांच्या हाताला जाऊन राखी बांधा, तुम्ही त्या ठिकाणी पापक्षालन करा. जेव्हा आमचे संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. अशी ताकीद देतो'. दुसरे महंत सुनील महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर आरोप होत असेल तर, येणाऱ्या २०२४ मध्ये त्यांची जागा दाखवू. तसेच भाजपलाही त्यांची जागा दाखवू'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

Vidula Chougule: चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण?

SCROLL FOR NEXT