PM Narendra Modi  Saam Tv
मुंबई/पुणे

Narendra Modi News: PM नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर; नवी मुंबई मेट्रोचं लोकार्पण होणार का?

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

Vishal Gangurde

Narendra Modi news:

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं लोकार्पण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती आलेली नाही. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी मुंबई दौऱ्यावर असणार आहे. नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑलम्पिक समितीचं अधिवेशन मुंबईतील जिओओल्ड सेंटरमध्ये १४ ते १७ ऑक्टोबरला पार पडणार आहे. तर या अधिवशेनात चाळीस वर्षानंतर दुसऱ्यांदा भारताला यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे.

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पूर्ण

नवी मुंबई मेट्रोचा 11 किलो मीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान, राज्य सरकारच्या नारीशक्ती सन्मान योजनेच्या कार्यक्रमासाठी हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तत्पूर्वी, खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्टेशनचं काम देखील पूर्ण झालं आहे. या कामांचंही लोकार्पण अद्याप बाकी आहे. त्यामुळे या कामांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT