PM Narendra Modi Solapur Visit Saam TV
मुंबई/पुणे

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे करणार उद्घाटन

PM Narendra Modi Mumbai Visit: मुंबईच्या कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Gangappa Pujari

सूरज मासुरकर, मुंबई|ता. २२ फेब्रुवारी २०२४

Mumbai Costal Road Inauguration:

मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईच्या कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कोस्टल रोडचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यापैकी एका तारखेला हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. १९ फेब्रुवारीलाच या कोस्टल रोडचे उद्घाटन होणार होते.

मात्र ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम रखडला गेला. या कोस्टल रोड प्रकल्पाचे 85% पेक्षा अधिक काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ४ लेन सुरु करण्यात येणार आहेत तर मे २०२४ पर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महत्व..

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे चांगलेच वाढल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्व असून निवडणुकांच्या दृष्टीने ते मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT