Water Pipeline  Saam Tv
मुंबई/पुणे

Pipeline Leakage: विरारमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Water Pipeline : वसई विरार परिसराला पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असताना पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील एक तासापासून पाणी वाया जात असून अद्यापही पालिका प्रशासनाकडून बंद न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(महेंद्र वानखेडे, विरार)

Water Pipeline Leakage :

विरारमधील नागरिकांना अजून पाणीटंचाईला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात विरार पूर्वेच्या आर.जे.सिग्नल,फुलपाडा रोडजवळ पाण्याची पाईपलाईन फुटलीय. पाईपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. दुपारी तीनच्या सुमारास पाईपलाईन लाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. (Latest News)

वसई विरार परिसराला पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असताना पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील एक तासापासून पाणी वाया जात असून अद्यापही पालिका प्रशासनाकडून बंद न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहणारे पाणी कोणत्याही पावसाचे नसून पाईप लाईन खोदताना फुटलेल्या पाण्याच्या वाहिनीचे आहे. ३ वाजता च्या सुमारास खोदकाम करताना हि पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याला ज्या ठेकेदाराने रस्त्याचे खोदकाम करताना निष्काळजीपणा केला त्याच्यावर दंड आकारण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.गिरीश दिवाणजी यांनी केली आहे.यामुळे विरार मधील मनवेलपाडा विभागातील भागात पाण्याचा तुटवडा भासणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT