"मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींचे मुंडन करून धिंड! SaamTvNews
मुंबई/पुणे

"मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींचे मुंडन करून धिंड!

गाव गुंडाला फोन वर भाई म्हटलं नाही म्हणून टोळक्याने एका तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन, कुत्र्याप्रमाणे बिस्किटे खायला लावून बेदम मारहाण केली होती.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : गाव गुंडाला फोन वर भाई म्हटलं नाही म्हणून गाव गुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन, कुत्र्याप्रमाणे बिस्किटे खायला लावून, कमरेच्या बेल्टने, लाठ्या-काठ्यांनी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. हि घटना 25 जानेवारीला पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील थेरगाव येथील लॉंड्री चौक याठिकाणी रात्री साडेदहा वाजता दरम्यान ही घटना घडली होती. 

हे देखील पहा :

गाव गुंडांनी तरुणाला मारहाण (Beating) करतानाचा व्हिडीओ (Video) मोबाईल कॅमेरावर शूट करून सोशल मीडियावर वायरल देखील केला होता. मात्र, आता या गाव गुंडांची दहशत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोडून काढली आहे. मारहाण झालेल्या प्रथमेश राजेंद्र दबडे या तरुणाच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी या गाव गुंडांच्या टोळी तील तीन आरोपींना अटक केली आहे. तर प्रथमेश ला मारहाण करणारा एक मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

या गावगुंडांचा धाक सर्वसामान्य नागरिकांतून मोडून काढण्यासाठी  वाकड पोलिसांनी या गावगुंडांचे मुंडन करून धिंड काढली आहे. त्याचबरोबर या गावगुंडांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून अतिशय कठोर कलम ह्या गाव गुंडांच्या टोळक्या वर वाकड पोलिसांनी लावली आहेत. प्रथमेशच्या तक्रारीवरून रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगारासह (Criminal) प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव ), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पावधीत नेम आणि फेम कमविण्याच्या नादात, हौशी गुन्हेगार स्वतः करत असलेल्या गुन्ह्याचे व्हिडियो तयार करून स्वतःच गुन्हेगार म्हणून उदात्तीकरण करून घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांत आपला धाक जमविण्यासाठी, हे गुन्हेगार स्वतःच्याच केलेल्या गुन्ह्याचे व्हिडिओ तयार करून त्याचे उदात्तीकरण करतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळी धडा शिकवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT