pimpri chinchwad Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

pimpri chinchwad news : पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या घटनेने तिन्ही कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरणात ३ बीएसएनएल कामगारांचा मृत्यू

केबल दुरुस्तीसाठी ड्रेनेजमध्ये उतरले असताना दुर्घटना घडली.

एक कामगारावर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु.

स्वातंत्र्यदिनी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ

पिंपरी-चिंचवडमध्ये एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला जात आहे. दुसरीकडे ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील निगडीत केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झालाय. तिघेही कामगार हे 'बीएसएनएल' कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिघांवर काळाने घाला घातला आहे. तिघांच्या मृत्यूने या कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणात ड्रेनेज पाईप लाइनमधून केबल टाकत असताना दुर्दैवी घटना घडली. ड्रेनेज लाइनमध्ये विषारी वायू गळती झाल्यामुळे काम करणाऱ्या 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

निगडी प्राधिकरणातील या दुर्देवी दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. बीएसएनएलच्या केबल दुरुस्तीसाठी हे कामगार ड्रेनेजच्या झाकणातून खाली उतरले होते. त्याचवेळी ही दुर्देवी दुर्घटना घडली आहे.

प्रत्यक्षदर्शी वाचलेले कामगार बाबासाहेब वाघ यांनी सांगितलं की, आम्ही चौघे चेंबरमध्ये वायर काढण्याचं काम करत होतो. आधी लखन धावरे चेंबरमध्ये उतरले. काही क्षणात त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. लखन यांना वाचवण्यासाठी दत्ता होनाले उतरले. मात्र त्यांनाही श्वास घेता येईनासा झाला. दोघांना बाहेर काढण्यासाठी दादासाहेबराव गिरसेट खाली उतरले. तेही खालीच कोसळले. मी लगेच ओरडून मदत मागितली. लोकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता'.

मृत कामगारांची नावे

लखन ढावरे (वय 30-32, रा. बिजलीनगर)

दत्ता होनाले (वय 35-38, रा. गुरुद्वारा कॉलनी)

दादा साहेबराव गिरसेट (वय 35-36, रा. बिजलीनगर)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT