Pimpri Chinchwad 
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : दिघीत मध्यरात्री थरार, दुचाकीवर आले अन् कोयत्याने सपासप वार केले, १७ वर्षाच्या पोराला संपवले

midnight knife attack Pune : दिघी परिसरात जुना वाद चिघळल्याने कोयत्याने वार करून १७ वर्षाच्या मुलाचा खून; पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Pune Pimpri Chinchwad Crime News : पिपंरची चिंचवडमधील दिघी परिसरात रविवारी मध्यरात्री हत्येचा थरार घडला. जुन्या भांडणाच्या वादातून १७ वर्षांच्या तरूणाची मध्यरा‍त्री हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जमांना बेड्या ठोकल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवर येऊन तिघांनी १७ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला.

पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास एका १७ वर्षीय अल्पवयीन बाल गुन्हेगार मुलाची जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या या घटनेनंतर दिघी आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.

१७ वर्षांच्या मुलाच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पोलिस पथकाने ३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सोहम सचिन शिंदे ( वय -१७ ) अस हत्या झालेल्या आलेल्या अल्पवयीन बाल गुन्हेगाराचं नाव आहे. पोनिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोहम हा दिघी वडमुखवाडी या ठिकाणी केकीज या केकच्या दुकानासमोर मित्रांशी गप्पा मारत बसला होता, अचानक दुचाकीवर आलेल्या काही गुन्हेगारांनी जुन्या वादातून वाद घातला. एक वर्षापूर्वी झालेल्या वादातून सोहमला शिवीगाळ करत धारदार कोयत्याने वार करत खून केला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमता विरोधी पथकाने आरोपी निलेश शिंदे , शुभम पोखरकर , सुमित शिंदे यांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT