Pimpri Chinchwad Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Crime News: चक्क रुग्णवाहिकेतून होत होती गांजाची तस्करी, ६ जणांसह २ रुग्णाहिका पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवाईत 1 कोटी 31 लाख 55 हजार 300 रूपये किमतीचा जवळपास 96 किलो 87 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

Sandeep Gawade

Pimpri Chinchwad Crime News

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवाईत 1 कोटी 31 लाख 55 हजार 300 रूपये किमतीचा जवळपास 96 किलो 87 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.या प्रकरणी कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे या चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात चारचाकी वाहन आणि काही रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती अंमलीपदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चारही आरोंपींना अटक केली. सोबतच त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त केल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्या एका ठिकाणी तसेच उत्तर प्रदेश येथील काही आरोपी महळूंगे पोलीस स्टेशन हद्दीत गांजा तस्करी करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा आणि सन्नीदेवल भगवानदास भारती यांना ताब्यात घेतलं. तसचं त्यांच्याकडून 2१ किलो गांजा जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT