Pimpri Chinchwad Breaking News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pimpri cylinder Blast: मोठी बातमी! स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, ५ जण होरपळले; पिंपरीमधील घटना!

Pimpri Chinchwad Breaking News: पिंपरीमधील बौद्धनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोपाल मोटघरे

पुणे, ता. २१ ऑगस्ट २०२४

पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरीमधील बौद्धनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदल दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील बौद्धनगर येथे आज सकाळी भीषण गॅस सिलेंडर स्फोट झाला आहे. या गॅस सिलेंडर स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी बौद्ध नगर बिल्डींग नंबर 16 मध्ये हा गॅस सिलेंडर स्फोट झाला आहे. 16 नंबर बिल्डिंग मधील एका रूममध्ये काही कामगार एकत्र राहतात. मात्र आज सकाळी साडेपाच वाजता दरम्यान हे कामगार स्वतःसाठी स्वयंपाक तयार करत असताना गॅस सिलेंडरची गॅस गळती होऊन हा स्फोट झाला आहे.

या स्फोटात मनोज कुमार (वय 19 वर्ष), धीरज कुमार (वय 23 वर्ष) गोविंद राम (वय 28 वर्ष) राम चेलाराम (वय 40 वर्ष) आणि सत्येंद्र राम (वय 30 वर्ष) हे पाच कामगार गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT