Pimpri-Chinchwad Ajit Pawar Group News  Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad: अजित पवार गटाला मोठा धक्का; बड्या पदाधिकासह शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार

Pimpri-Chinchwad NCP News: पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याने ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोपाळ मोटघरे

Pimpri-Chinchwad Ajit Pawar Group News

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पदाधिकाऱ्यांचं तसेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, यासाठी अजितदादा गटाकडून त्यांना महागड्या गाड्या देखील भेट देण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे काही कार्यकर्ते नाराजही झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाच्या (Ajit Pawar) बड्या पदाधिकाऱ्याने ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे पदाधिकारी समजले जाणारे संजोग वाघेरे हे आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

यासाठी वाघेरे भल्यापहाटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहर हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे इथे मोठी ताकद आहे.

त्याच राष्ट्रवादी गटाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे आज अखेर शिवबंधन बांधणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित असल्याचे बोलल जात आहे.

संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शिवबंधन बांधणार असले तरी यावेळी पक्ष सोडत असताना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना वाघेरे हे भावूक देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT