Police Investigation in Pimpari Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

क्रूरतेचा कळस! बायकोच्या संशयित प्रियकराचं अपहरण, गुप्तांगावर मारला स्प्रे, त्यानंतर...

पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या संशयित प्रियकराचे अपहरण करुन त्याच्या गुप्तांगावर वेदनाशामक स्प्रे मारून अतिशय क्रुरपणे यातना दिल्या. या प्रकरणी पीडित व्यक्तीने दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेवून आरोपी अजय आणि प्रमोद यांच्या (Police case filed) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी (culprit arrested) प्रमोदला अटक केली असून आरोपी राजेंद्र अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचं पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने पीडित व्यक्तीचं वाकडच्या छत्रपती चौकातून अपहरण केलं. त्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तीला वारजेच्या दिशेनं खासगी चारचाकी कारमध्ये घेऊन जात असताना जबर मारहाण केली.वारजे येथील एका फ्लॅटच्या बंद खोलीमध्ये पीडित व्यक्तीला नेण्यात आले.

त्यानंतर त्याला ऊस,लोखंडी रॉड आणि चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करून गुप्तांगावर, नाकावर आणि डोळ्यावर गंभीर इजा केली. त्यानंतर आरोपी पीडित व्यक्तीला जीवे मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जात होता. त्यावेळी बिल्डिगच्या पार्किंगमधून पीडित व्यक्तीनं पळ काढून हल्लेखोरांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली, अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित माने यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT