Pimpari Chinchwad Fire Saamtv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव! हार्डवेअरच्या दुकानाला आग; एकाच कुटूंबातील ४ जणांचा मृत्यू

Pimpari Chinchwad Hardware Shop Fire: पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

गोपाल मोटघरे

Chikhali Hardware Shop Fire: पुणे पिंपरी चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटूंबतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. (Pimpari Chinchwad News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमधील चिखली (Chikhali) पोलीस स्टेशनच्या हद्दीत शाहूनगर परिसरात सचिन हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. या दुकानाला दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की त्यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.

आग लागल्याची माहिती समजताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, ज्यानंतर आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा सांगण्यात येत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

चिमणाराम चौधरी (वय, ४५) द्यानुदेवी चौधरी (वय ४०) सचिन चौधरी (वय, १०) आणि भावेश चौधरी (वय, १५) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT