Crime Saam tv
मुंबई/पुणे

उल्हासनगर हादरलं! नराधमाकडून चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार, आधी शौचालयात नेलं अन्..| Ulhasnagar

Physical assault on Child: एका अल्पवयीन मुलावर शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Bhagyashree Kamble

उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलावर शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडित मुलाने थेट पालकांना सांगितली. पालकांनी तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली.

नेमकं काय घडलं?

पीडित लहान मुलगा उल्हालनगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर, आरोपीचे नाव अमित कोतपिल्ले असे आहे. ही संतापजनक घटना गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीने आधी मुलाला शौचालयात नेले. नंतर मुलाबरोबर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलाने थेट घर गाठत पालकांना आपबिती सांगितली.

पीडित मुलाने पालकांना याबाबत सांगताच पालकांनी मुलाला घेऊन तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम अमित कोतपिल्ले याला बेड्या ठोकल्या. कोतपिल्ले हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला असून यापूर्वी देखील त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT