Ulhasnagar News Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५५ रुपयात पेट्रोल वाटप, नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

Raj Thackeray Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये ५५ रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. मनसे विद्यार्थी सेनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५५ वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने उल्हासनगरमधील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी नागरिकांना अवघ्या ५५ रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे. (Latest Marathi News)

यासाठी नागरिकांना कूपन वाटप करण्यात येत असून प्रत्येक नागरिकाला १ लिटर याप्रमाणे ५५ रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेरपर्यंत वाहन चालकांच्या रांगा लागल्या आहेत. (Maharashtra Political News)

राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणासारखा आहे. त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर उपाय म्हणून आम्ही ५५ रुपयात पेट्रोल वाटप करत असल्याचं मनोज शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT