Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

बदलापुरात पाळीव कुत्र्याचा लहानग्यावर हल्ला; मालकावर गुन्हा दाखल

या घटनेनंतर आपले पाळीव कुत्रे हे इतरांसाठी धोकादायक ठरू नये, आणि आपल्यासाठीही डोकेदुखी ठरू नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अजय दुधाणे

बदलापूर - एका पाळीव कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला करून त्याचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुर येथे घडला आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू वर्ल्ड नावाची सोसायटी बदलापूर (Badlapur) पश्चिमेच्या बॅरेज रोडला आहे. या सोसायटीतल्या सातव्या मजल्यावर निलेश बांगे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्याच इमारतीत पाचव्या मजल्यावर भावेश चौहान हे देखील राहतात. चौहान यांच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. शनिवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास निलेश बांगे हे त्यांच्या मुलासोबत जिन्याने खाली उतरत होते.

हे देखील पाहा -

ते पाचव्या मजल्यावर आले असता अचानक भावेश यांच्या घरातून त्यांचा पाळीव कुत्रा धावत आला आणि त्याने लहान मुलावर हल्ला चढवत त्याच्या पायाचा चावा घेतला. यावेळी निलेश यांनी कुत्र्याला हाकलल्याने तो आत पळाला. ही सगळी घटना जिन्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

या घटनेनंतर निलेश बांगे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भावेश चौहान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आपले पाळीव कुत्रे हे इतरांसाठी धोकादायक ठरू नये, आणि आपल्यासाठीही डोकेदुखी ठरू नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT