Mantralay, mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसबाहेर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, मंत्रालयातील घटनेने पोलिसांची धावपळ

सूरज सावंत

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून ४६ वर्षीय व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुरेश जगताप असं या व्यक्तीचं नाव आहे. हा व्यक्ती मुळचा सातारामधील फलटण येथील रहिवाशी आहे.

सुरेश जगताप २ ऑगस्टच्या दुपारी मंत्रालयातील पास घेऊन मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील लॉबीत आला होता.

त्यानंतर कुणाला काही समजायच्या आत आणि सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवत आत्महतेचा प्रयत्न केला. स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करून स्वत:ला जखमी करून घेतले. (Latest Marathi News)

पोलिसांनी तत्परता दाखवत वेळीच सुरेश यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुरेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Political News)

पोलिसांनी त्याला ४१ अ १ अन्वेय अंतर्गत नोटीही जारी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT