Building Collapse In Thane प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Thane: कल्याणफाटा जवळील इमारतीचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

Building Collapse In Thane: या परिसरात जवळच असलेल्या लकी कंपाऊडमध्ये काही वर्षांपूर्वी इमारत पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता.

प्रदीप भणगे

ठाणे: ठाणे महापालिकेच्या हद्दीतील कल्याण-शीळ रोडवरील कल्याणफाटा येथे एका पाच मजली इमारतीचा काही भाग रात्री 11.30 ते 12 च्या सुमारास कोसळला (Building Collapse). या इमारतीत 15 कुटुंब रहात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली, तर यामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याबाबत ठाणे (Thane) महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांना विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. (Building Collapse In Thane)

हे देखील पाहा -

या परिसरात जवळच असलेल्या लकी कंपाऊडमध्ये काही वर्षांपूर्वी इमारत पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता. तरीही दिवा, शीळ, पडले या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असून ठाणे महापालिका याकडे गांभिर्याने पहात नाही. स्थानिक नागरिकांनी महापालिकेला वारंवार कळवूनसुद्धा शीळ आणि दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार करुनही पालिका याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे लकी कंपाउंड ची घटना या परिसरात पुन्हा होऊ नये याकडे नवीन स्थापित झालेल्या शिवसेना आणि भाजपा सरकारने गंभीरपणे लक्ष द्यावे असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT