Pankaja Munde News Saam Tv
मुंबई/पुणे

Pankaja Munde News : PM मोदींच्या दौऱ्यात सहभागी होणार नाही; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची पंकजा मुंडेंनी केली विचारपूस

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Pankaja Munde News : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला काही दिवसांपूर्वी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. सध्या धनंजय मुंडे हे ब्रीच कन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यामुळे आज, बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

धनंजय मुंडे (Dhananjay munde) काही दिवसांपूर्वी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते. त्यावेळी मध्यरात्री दीड वाजता त्यांच्या चालकाचा वाहनावरचा (vehicle) ताबा सुटल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात मार लागल्याने धनंजय मुंडे सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे.

काल, मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर आज, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णलयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'आज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते.जेव्हा अपघात झाला, तेव्हा मी नाशिकला होते. आता त्यांची तब्येत बरी आहे. त्यांची पत्नी तिथे होत्या, त्यांच्याशी देखील मी बोलले'.

'अनेक राजकारणी भेटायला येतात, मी बहीण आहे. धनंजय मुंडे मागे देखील रुग्णालयात अॅडमिट होते, तेव्हाही मी भेटायला आले होते. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे, असे पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात सहभागी होणार का, यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय दौरा आहे. त्यामुळे मी यामध्ये कदाचित सहभागी होणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT