gauri garje case  Saam tv
मुंबई/पुणे

PAचा फोन आला, पत्नीच्या आत्महत्येने आक्रोश; गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश

gauri garje case : गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंडे यांनी योग्य तपास करण्याचेही आदेश दिले आहेत.

Vishal Gangurde

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या

लग्नाच्या काही महिन्यानंतर गर्जेंच्या पत्नीने आयुष्य संपवलं

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडे याची पहिली प्रतिक्रिया

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसांतच त्यांच्या पत्नीने आयुष्य संपवलं आहे. मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, काल संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती'.

'पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजु शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT