Palghar Theft, Mokhada House Burglary Saam TV
मुंबई/पुणे

पालघर हादरले! घरातले सगळे मयतीला गेले, चोरट्यांनी साधला डाव, ५० लाखांची रोकड पळवली; टेरेसवरून आले अन्

Palghar Theft, Mokhada House Burglary : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे मयतीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात मोठी घरफोडी झाली. चोरट्यांनी टेरेसवरून प्रवेश करत २५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ५० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, पालघर प्रतिनिधी

Palghar crime news today : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एक थरारक आणि मोठी घरफोडी उघडकीस आली आहे. नातेवाईकाच्या मयतीनिमित्त संपूर्ण कुटुंब घराबाहेर गेले असल्याची संधी साधत चोरांनी तब्बल ५० लाखांहून अधिक रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे मोखाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?

मोखाडा येथील रहिवासी जाहीद शेख यांच्या मामाच्या मुलाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दु:खद बातमीमुळे शेख कुटुंबीय भिवंडी येथे मयतीसाठी गेले होते. जवळचे नाते असल्याने त्यांना एक रात्र तिथेच थांबायचे ठरले. घразव Le सर्वजण बाहेर असल्याची टीप चोरट्यांना लागली असावी, असा संशय आहे.

रात्री साडेअकराच्या सुमारास २० ते २३ वयोगटातील दोन संशयित इसमांनी घराच्या मागील बाजूने व टेरेसवरून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी सोन्याच्या साखळ्या, बांगड्या, हार, वेढे आणि कर्णफुलांसह तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने आणि मोठी रोख रक्कम असा एकूण ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लांबवला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

पोलीस तपास सुरू

सकाळी कुटुंबीय घरी परतल्यावर घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Result : मोठी बातमी! भाजपची ताकद आणखी वाढली, ८ खासदारांची बिनविरोध निवड, पाहा यादी

Maharashtra News Live Update: अभिजित दिपके दिल्ली विमानतळावर दाखल

Sarva Pitri Horoscope: सर्वपित्री अमावस्याला या ५ राशींचे नशीब पालटणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमची रास यात आहे का?

जंतर-मंतर आंदोलनाआधीच ध्रुव राठी ताब्यात, सकाळी सकाळीच पोलिसांनी घरातून उचलले

PF Withdrawal Alert: PF चे पैसे काढण्याचे नियम बदलले! Form 15G आणि 15H बंद; आता कोणता फॉर्म भरावा लागणार?

SCROLL FOR NEXT