Palghar Crime News  Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar Crime News : महाराष्ट्र हादरवणारी घटना ; एकाच घरात आई-वडील आणि मुलीचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलं?

Palghar Crime : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातीत तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.

Sandeep Gawade

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात खळबळजनक घटना घडली आहे. १३ दिवस आई-वडील आणि बहिणीशी संपर्क झाला नाही. मनात हजार शंकाचं काहून उठलं होतं. त्यामुळे मुलाने थेट पालघर गाठलं. घरचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि मनात उठणाऱ्या शंकाना वाव मिळाला, घरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती.

नेमकं काय झालं आहे समजत नव्हतं..घरात शोधा शोध सुरू झाली अणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. आई-वडील आणि बहिणीच मृतदेह कुजलेल्या स्थिती होते. आई आणि बहिणीचा मृतदेह कपड्यात झाकून ठेवले होते तर वडिलांचा मृतदेह बातरूममध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांचे कुजलेले मृतदेह जे.जे. रूग्णालयात पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. वाडा तालुक्यातील नेहरोली ग्रामपंचायत हद्दीत बोन्द्रे आळीत गेल्या पंचवीस वर्षांपासून गुजरातचे राठोड कुटुंब राहात होते त्यांचा मोठा मुलगा सुहास हा गुजरात येथे तर लहान मुलगा पंकज विरार ला राहत आहे.

गेल्या तेरा दिवसांपासून घरच्यांसी संपर्क होत नसल्याने सुहास राठोड हा गुजरात हून नेहरोली वडिलांच्या घरी पोहोचला घराला टाळे असल्याने घरात आधारकार्ड मिळतात का या आशेने ग्रामस्थांच्या मदतीने टाळे तोडले घरात प्रवेश करताच कुजल्याचे वास येऊ लागले शोधा शोध केली असता वडील मुकुंद राठोड यांचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आले तर आई कांचन व बहीण संगीता या दोघींचे मृतदेह वर कपड्यांचे थर टाकून लपविण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांचे कुजलेले मृतदेह जे.जे. रूग्णालयात पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT