Palghar Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

Palghar Police: पालघरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर ६ जणांनी बलात्कार केला. पालघरच्या तलासरीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.

Priya More
  • पालघरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • मित्रासोबत पिकनिकला गेली असता घडली घटना

  • ६ जणांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • पालघर पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मित्रासोबत फिरण्यासाठी गेली असता ६ जणांनी तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. पालघरच्या तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात सहाही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या आत ३ आरोपींना अटक केली. तर उर्वरित ३ जणांचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिस ठाण्यात हद्दीत सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेने पालघर जिल्हा हादरला आहे. मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर ६ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. ही तरुणी मित्रासोबत गुजरातच्या उमरगाव येथे फिरण्यासाठी गेली होती. त्याठिकाणावरून परत येत असताना तिच्या मित्राची दुचाकी बंद पडली.

दुचाकी खराब झाल्यामुळे ते महामार्गावर उभे होते. त्याचवेळी त्याठिकाणी दोन दुचाकीवरून सहा तरुण आले. या सर्वांनी तरुणीच्या मित्रासोबत झटपट केली आणि तिचे अपहरण केले. पीडित तरुणीला आरोपी एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात घेऊन गेले. त्याठिका आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित तरुणी तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सहाही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि शोध सुरू केला. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली तर उर्वरीत ३ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

मिरारोडमध्ये १४ वर्षीय मुलीवर ६ जणांनी बलात्कार केला. नववीमध्ये शिकणारी ही मुलगी आपल्या आईसोबत मिरारोड येथे राहते. जून महिन्यामध्ये एका २५ वर्षीय तरुणाने तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करत होता. सतत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. या तरुणाने आपल्या ५ मित्रांसह पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी काशिगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस २ आरोपींना अटक केली तर उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

शिंदेसेनेचं महापौरपदासाठी ऑपरेशन टायगर? ठाकरेसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडणार?

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

'मेस्सी'वादळ शमलं...! जगज्जेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

SCROLL FOR NEXT