Palghar Jayesh Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पालघरच्या राजकारणात मोठी उलथापालथ; बड्या नेत्याने केला बविआमध्ये प्रवेश

Palghar Jayesh Patil News : पालघरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आगरी सेनेचे जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

Alisha Khedekar

  • आगरी सेनेचे प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

  • त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला

  • विरारच्या विवा कॉलेजमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला

  • शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही बविआमध्ये प्रवेश केला

Palghar Jayesh Patil Joins Hitendra Thakur Party पालघरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अधिकृतपणे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील आगरी सेनेला रामराम करत बविआमध्ये प्रवेश केला.

जयेश पाटील यांनी काल हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा विरार येथील विवा कॉलेजमध्ये पार पडला. यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जयेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. जयेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर त्यांनी 'बविआ'चा पर्याय निवडत नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. आगरी समाजात जयेश पाटील यांचे दांडगे जनसंपर्क आणि नेटवर्क मजबूत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत असलेल्या आगरी सेनेतील ही फूट भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजस्थानचा 'रॉयल' विजय; वैभव सूर्यवंशीच्या वादळात RCB चा पालापाचोळा, ध्रुव जुरेलची तुफानी फटकेबाजी

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य आणि हार्बर लाईनवर 'मेगा ब्लॉक'; कोणत्या गाड्या बंद राहणार?

नोबेलसाठी पाकची युद्धात मध्यस्थी? काकासाठी पुतणी मागते नोबेल

अमेरिकेनंतर भारतातही झोम्बीचा शिरकाव, भारतीय तरुणाई झोम्बी ड्रग्जच्या विळख्यात?

Sonam Wangchuk : कारगिल युद्धाचे महानायक कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन

SCROLL FOR NEXT