Palghar Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar Accident Video : यू-टर्न महागात पडला; कारची बाईकला जोरदार धडक, भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद

Palghar Accident Video : पालघरच्या बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदलेजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने बाईकला धडक दिली.

प्रविण वाकचौरे

Palghar Accident News :

पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीन जखमी झाले असून सर्वांवर उपचार सुरु आहे. अपघाताची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघरच्या बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदलेजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने बाईकला धडक दिली. अपघाताची घटना चारचाकी वाहनाच्या डेस्क बोर्डवर लावलेल्या कॅमेरात कैद झाली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, चारचाकी वाहन वेगाने धावत असताना अचानक समोर बाईक आडवी येते. वाहन चालकाने वेग कमी करुन वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही बाईकला जोरदार धडक बसली. (Latest Marathi News)

धडक इतकी जोरदार होती की बाईकवरील दोघे जण बाजूला फेकले गेले आणि बाईक बरीच दूर घसरत गेली. धडकेनंतर मोठा आवाज झाला. या आवाजानंतर आजूबाजून लोक मदतीसाठी धावले.

अपघातात बाईकचं मोठं नुकसान झालं आहे. तर बाईक वरील दोन जन गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT