Palghar Jawhar accident latest news 
मुंबई/पुणे

Accident : भीषण अपघातात २ शाळकरी मुलांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी, पालघरमध्ये हळहळ

Palghar Jawhar accident latest news : पालघरच्या जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, पालघर प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जव्हारमधील गगनगिरी अनुदानित आश्रम शाळा, हिरडपाडा येथील काही विद्यार्थी रात्रीच्या वेळी आश्रम शाळेतून बाहेर पडून गरबा खेळण्यासाठी गेले होते. यादरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि हॉस्टेल व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हिरडपाडा येथील गगनगिरी अनुदानित आश्रम शाळेतील काही विद्यार्थी रात्रीच्या सुमारास गरबा खेळण्यासाठी सारसून निघाले होते. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी एका दुकानदाराकडे "दवाखान्यात जायचे आहे" असे सांगून एक मोटरसायकल मागितली होती. या एकाच मोटरसायकलवर तब्बल पाच विद्यार्थी बसून जवळच असलेल्या गावात गरबा खेळण्यासाठी गेले होते. मात्र, गरबा खेळून रात्री परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी तात्काळ जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या तीनही जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी बाहेर पडत असताना संबंधित अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक काय करत होते? असा संतप्त सवाल पालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे दुचाकी कशी आली आणि आश्रम शाळेच्या प्रशासनाचा विद्यार्थ्यांवर वॉर्डन किंवा अधीक्षकांचा वचक आहे का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद लाड यांच्या भविष्यातील जबाबदारीची काळजी घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Indian Railways : रेल्वे प्रवासात संकट ओढावल्यास चैन ओढण्याऐवजी वापरा 'हे' पर्याय

Dasara 2026 : दसऱ्याच्या सणाचा गोडवा वाढवा, पहिल्याच प्रयत्नात 'पुरणपोळी' बनेल मऊ अन् स्वादिष्ट

Oral Health Care Tips: जीभ पिवळी पडणे म्हणजे साधी गोष्ट नाही! तुमच्या शरीरात काय बिघडतंय? व्हा सावध

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी ३ जणांना रेल्वे स्टेशनवर घेतलं ताब्यात, CCTV फुटेज आले समोर

SCROLL FOR NEXT