Measles Disease Saam Tv
मुंबई/पुणे

Measles Disease : मुंबईत गोवरचा विळखा; एकूण रुग्णसंख्या 126 वर

मुंबईतील गोवरचा उद्रेक; सर्वाधिक रुग्णसंख्या गोवंडीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबईमध्ये झोपडपट्टी भागात गोवर आजाराचा धोका वाढला आहे. मुंबईत (Mumbai) गोवरचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय असून कस्तुरबा रुग्णालयात (Hospital) 61 मुलांवर उपचार सुरु आहेत. तर सहा मुलं व्हेंटिलेटर देखील असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत संसर्गजन्य गोवर आजाराचे आणखी १७ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. जानेवारी २०२२ ते १४ नोव्हेंबर पर्यंत मुंबईत गोवरची एकूण रुग्णसंख्या १२६ इतकी झाली आहे.

दरम्यान, पालिकेकडून मुंबईत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे असून यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या गोवंडीत १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेकडून उपाययोजना

महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. याच सोबत विविध ठिकाणी लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक संघटना सुद्धा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत.

गोवर आजाराची कारणे

गोवर हा आजार Paramyxovirus या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतो. या विषाणूचे इन्फेक्शन झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते.

गोवर आजाराची लक्षणे

सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT