Nagpur : बनावट नोटाप्रकरणी चौघांना १२ वर्षांची शिक्षा; मोठे रॅकेट उघड

तीन आरोपींना प्रत्येकी १४ लाख आणि एका आरोपीला २० लाख रुपयांचा दंड
Nagpur News
Nagpur NewsSaam TV

नागपूर - बनावट नोटा प्रकरणी नागपूरच्या (Nagpur) विशेष एनआयए कोर्टाने चार आरोपींना १२ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर तीन आरोपींना प्रत्येकी १४ लाख आणि एका आरोपीला २० लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. २०१५ च्या या प्रकरणात सोमवारी एनआयएच्या विशेष कोर्टाने युएपीए कायद्याखाली निकाल देत आरोपींनी केलेले कृत्य दहशतवादी कृत्य असल्याचे नमूद करीत शिक्षा सुनावली. (Nagpur Latest News)

Nagpur News
Petrol Diesel Price : 'या' राज्यात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत मोठा बदल

४ ऑक्टोबर २०१५ ला नागपूर रेल्वे स्टेशनवर बनावट नोटासह एक व्यक्ती येत असल्याची गुप्त माहिती नागपूर एटीएसला प्राप्त झाली. त्यानुसार एटीएस ने सापळा रचून मीर अन्वरुल नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९ लाख ११ हजार रुपयांचा नोटा जप्त करण्यात आल्या. अधिक तपास केल्यावर आणखी दोघेजण बनावट नोटा घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती एटीएसला लागली. त्यानुसार १८ ऑक्टोबर २०१५ ला अब्दुल गफ्फार आणि अब्दुल सत्तार यांनाही नागपूर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले.

त्यांचेकडून ५ लाख रुपयांचा नोटा जप्त केल्या. या नोटांची तपासणी करण्यासाठी नाशिकच्या नोटांच्या छापखान्यात मध्ये पाठवण्यात आल्या. त्यात या नोटा बनावट असल्याचा रिपोर्ट नाशिकच्या छापखान्याने दिला. या प्रकरणात सोमवारी एनआयएच्या विशेष कोर्टाने निकाल देत मीर अन्वरुल,अब्दुल गफ्फार आणि अब्दुल सत्तार यांना प्रत्येकी १४ लाख तर ओबेदुल्ला याला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.

अब्दुल गफ्फार आणि अब्दुल सत्तार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील भाई पठार या गावातील राहणारे आहेत. तर मीर अन्वरुल आणि ओबेदुल्ला हे पश्चिम बंगालच्या मालदा येथील राहणारे आहेत. बल्लारशाह च्या ऍक्सिस बँक शाखेतून दोन्ही आरोप ओबेदुल्ला च्या खात्यात खरे पैसे टाकायचे त्यानंतर त्यांना मालदा वरून बनावट नोटा प्राप्त व्हायच्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com