Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला फोडण्याचा विरोधकांचा डाव; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

शिवसेना पक्ष फोडल्यानंतर विरोधकांचे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस - रोहित पवार

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तापत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना अनेक मुद्यांना हात घातला. मात्र, याच मुलाखती दरम्यान त्यांनी विरोधकांना आमचं कुटुंब फोडायचे असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

तसंच शिवसेना (Shivsena) पक्ष फोडल्यानंतर विरोधकांचे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फोडण्याचे टार्गेट असल्याचंही ते या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत. पवार यांना मुलाखतकारांनी प्रश्न विचारला की, आपले आणि अजित पवार यांच्यात सबंध कसे आहेत, तुमच्या सबंधांमध्ये तणाव आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिले तिकीट अजित पवार यांनी दिले. मला आमदारकीचे तिकीट त्यांनीच दिले, एवढेच नव्हे तर माझं लग्न देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनीच जमवलं आहे. तुम्हाला प्रगती करायची असते तेव्हा तुम्ही कुटुंबात स्पर्धा करू शकत नाही.

आमचे ध्येय वेगळे आहे. सुप्रियाताईंचे टार्गेट लोकसभा आहे. अजित पवार राज्यात काम करतात आणि मी माझ्या मतदारसंघात काम करतो. पण विरोधकांना आमचे कुटुंब फोडायचे आहे. कुटुंबाअंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल असं विरोधकांना वाटतं. शिवाय शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष विरोधकांचा टार्गेट असून त्यांनी ज्याप्रमाणे शिवसेना पक्ष फोडला त्याप्रमाणे त्यांना आमचा पक्ष फोडायचा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी मुलाखतीदरम्यान केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mrunal Thakur : अभिनयासाठी कॉलेज सोडलं, टीव्हीन तिला स्टार बनवलं, मृणाल ठाकूरच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Bollywood Best Friend: तेरा यार हूँ मैं...; बॉलिवूडच्या ७ जिगरी मित्रांच्या जोड्या तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra Live News Update : सुरेश वरपुडकर जरी भाजप मध्ये गेले असले तरी परभणीतील काँग्रेस जागेवरच

Ed Raids in Mumbai : ईडीची मोठी कारवाई! मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ८ ठिकाणी छापे, ४७ कोटींचं घबाड|VIDEO

SCROLL FOR NEXT